Tuesday, August 4, 2015

ग्रामीण औद्योगिक कौशल्य गांव उरळी, जिल्हा अकोले श्रेय प्रल्हादराव नेमाडे.

http://youtu.be/ECNl2i7DGwU
सोनियाचा दिवस येऊ दे -- शेतकरी सुखी राहू दे. गांव उरळी, जिल्हा अकोले श्रेय प्रल्हादराव नेमाडे.
वर्ष २००८ ते २०१० या काळात मी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागात अपर मुख्य सचिव पदावर असताना मला छोट्या प्रतीच्या मशीन्सवर औद्योगिक कौशल्य, जे ग्रामीण भागात उपयोगी असते, त्यात विशेष रस आहे हे पाहून कुणीतरी ही वीडियो टेप आणून दिली होती - यातील संदर्भ माहीत नाहीत पण यामधे अकोले जिल्ह्यातील उरळ गावातील एक ग्रामीण कल्पक यंत्रज्ञ श्री प्रल्हादराव नेमाडे यांचा उल्लेख असून त्यांना पेटंटही मिळाल्याचे दिसते. मुंबई येथील वस्त्रोद्योग अभियांत्रिकी  संशोधन  इन्स्टिट्यूटने (CITCR) त्यांना सहाय्य केले आणि प्रत्यक्ष मशीनरी पुणे जिल्ह्यातून यशवंत ग्रुप लघुउद्योजक यांनी बनवून दिली. इथले छायाचित्रण प्रत्यक्ष ग्रामीण भागात मशीनरी कार्यरत असतानाचे आहे. त्यांत वृद्धांना देखील कमी कष्टाचे काम पण उत्पादक काम करता येईल अशी व्यवस्था दिसते. ही मशीनरी आजही कार्यरत आहे का? शेवटचे सोनियाचा दिवस येऊ दे शेतकरी सुखी राहू दे हे पसायदान अप्रतिम. याबाबत ज्यांना कुणाला काही संदर्भ माहीत असतील ते कृपया कृपया सांगावेत. खूपसे अभियांत्रिकी, सामाजिक व अर्थशास्त्रीय संशोधन या विषयावर होऊ शकते.  


No comments: